Wednesday, October 7, 2009

ड्रायफ्रुट करंजीचे सारण

Dry Fruit Karanji Stuffing in English

वेळ: साधारण ५० मिनीटे
यिल्ड: साधारण २ कप
bake karanji, dry fruit karanji, khobaryachya karanjya, diwali faral, साहित्य:
३/४ कप बारीक रवा
१/२ कप खवा, भाजलेला (रिकोटा चिजपासून खवा)
१/२ टिस्पून वेलची पूड
५ टेस्पून पिठीसाखर किंवा चवीनुसार
३ टिस्पून तूप
अर्धा ते पाऊण कप ड्राय फ्रुट्स, मी पुढीलप्रमाणे वापरली:
२ टेस्पून चारोळी
७ ते ८ काजू, बारीक तुकडे
७ ते ८ बदाम, पातळ चकत्या
६ ते ७ खजूर, बिया काढून बारीक चिरून घ्यावे
५ ते ६ खारका, बिया काढून बारीक चिरून घ्यावे.
१/४ कप किसलेले सुकं खोबरं, भाजून
२ टिस्पून खसखस, हलकीशी भाजून

कृती:
१) पॅनमध्ये २ टिस्पून तूप गरम करून त्यात चारोळी, काजूचे तुकडे, बदाम स्लाईसेस, चिरलेली खारीक घालून ५ ते ८ मिनीटे मध्यम आचेवर परतावेत. खजूर आधीच घालू नये. गॅसवरून पॅन बाजूला करायच्या आधी २ मिनीटे खजूर घालून परतावे. नंतर एका परातीत काढून ठेवावे.
२) त्याच पॅनमध्ये १ टिस्पून तूप गरम करून त्यात रवा गुलाबीसर रंगावर भाजावा. भाजताना आच मंद किंवा मध्यम असावी. बारीक रवा खुप मोठ्या आचेवर भाजल्यास करपू शकतो. तसेच पटकन ब्राऊन झाला तरी तो निट भाजला गेलेला नसतो. कचवट राहातो.
३) आता भाजलेला रवा, भाजलेला खवा, भाजलेली ड्राय फ्रुट्स, भाजलेली खसखस आणि वेलचीपूड घालून निट मिक्स करावे. खासकरून खवा निट मिक्स करावा कारण त्याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते. शेवटी चवीनुसार साखर घालून मिक्स करावे. (टीप १)

टीप:
१) साखर नको असेल तर गोडपणासाठी साखरेऐवजी खजूराचे प्रमाण वाढवावे.
२) घरातील उपलब्धतेनुसार तसेच आवडीनुसार कोणताही सुकामेवा वापरू शकतो जसे पिस्ता, अक्रोड, बेदाणे ईत्यादी.
३) या सारणापासून ड्रायफ्रुट करंजी किंवा ड्रायफ्रुट मोदक बनवू शकतो.

Tuesday, October 6, 2009

September 2009 Recipes

September 2009 Recipes

सूप - Soup
मक्याचे सार - Corn Soup

अपेटाईजर - Appetizer
पनीर ६५ - Paneer 65

चटणी - Chutney
मिरचीचा खरडा - Green Chili Kharda

भाजी - Curry
फरसबीची भाजी - French Beans Sabzi

फ्लॉवर बटाटा रस्सा - Cauliflower Potato Curry

आमटी - Dal
कटाची आमटी - Katachi Amti

पराठा - Paratha
पुदीना पराठा - Mint Paratha

गोड - Sweets
मूगडाळ हलवा - Moong Dal Halwa

स्नॅक्स - Snack
मेथी शंकरपाळे - Fenugreek Shankarpale

September 2008 Recipes:

हिरवी चटणी, चिंचगूळाची चटणी - Green chutney and Tamarind Chutney

पिटा ब्रेड - Pita Bread

हुम्मुस - Hummus

मेथीच्या देठाची भजी - Fenugreek stem Pakoda

पनीर कोफ्ता करी
- Paneer Kofta Curry

चकली - Chakali

September 2007 Recipes:

कोथिंबीर वडी - Kothimbir Vadi (Cilantro savory cakes)

मसालेभात - Masalebhat (Spiced Rice)

चणाडाळ लाडू - Chana Dal Ladu

पालक पुरी - Palak puri (Spinach Puri)

साबुदाणा थालिपीठ - Sabudana Thalipith

पंचामृत - Panchamrut

मूग भजी - mung Pakoda